वेब नागपुर मध्ये आपले स्वागत आहे
इंटरनेट सर्वसामान्यांच्या जीवनात गरजेची बाब बनली आहे. मग ते बिल भरायचं असोत की टॅक्स किंवा तिकीट काढणे, सर्वसामान्यांच्या अशा विविध गरजा एका क्लीकवर सोडवता याव्यात , म्हणून " वेब नागपूर " हा ऑनलाईन उपक्रम . माननीय राज्यपाल महाराष्ट्र श्री भगतसिंगजी कोश्यारी यांनी राजभवन येथे "वेब नागपूर" ऑनलाईनचं लोकार्पण केलं. यावेळी माननीय राज्यपाल यांनी समाजहितासाठी सुरु केलेल्या या निःशुल्क ऑनलाईन उपक्रमाला शुभेच्छा दिल्या, आणि या उपक्रमाचं कौतुक केलं.
भारतात ७४ कोटींच्या वर लोकं इंटरनेटचा वापर करतात, महाराष्ट्र आणि आपल्या नागपूरातंही ६० टक्क्यांपेक्षा जास्त लोक इंटरनेट वापरतात. त्यामुळे इंटरनेटच्या या जगात सर्वसामान्यांच्या रोजच्या गरजा ॲानलाईन सोडवता याव्यात, यात लाईट बिल भरणे, कर भरणे, तक्रार करणे, तिकीट काढणे, गॅस सिलिंडर बुक करणे, कोर्ट केसेस, प्रशासनात्मक प्रक्रिया इत्यादी सारख्या गरजा एका क्लिकवर सोडवता याव्यात, म्हणुन " वेब नागपूर" ही वेबसाईट नागपूरकरांच्या सेवेत लॅांच केली आहे. प्रत्येक नागपूरकरांनी आपल्या रोजच्या गरजांसाठी वापरता येणारी ही निःशुल्क वेबसाईट आहे. सर्वसामान्य नागपूरकरांना वेबसाईट वापरण्याचं प्रशिक्षण देण्यात येणार असून, ‘वेब नागपूर’ नावाचं कार्डंही देण्यात येणार आहे, ज्यामार्फत २४ X ७ X ३६५ प्रशिक्षण, सुविधा, सोशल मिडिया सुरक्षा आणि मदतकेंद्राशी कनेक्ट राहता येईल.
केंद्र आणि राज्य सरकार सघ्या ॲानलाईन व्यवहारांना प्रोत्साहन देत आहे. नागपूर महानगरपालिका, जिल्हा प्रशासन आणि इतर शासकीय विभागांनी आपल्या जवळपास सर्वच सेवा ऑनलाईन सुद्धा केल्या आहेत , पण बरेच लोक माहिती अभावी याचा लाभ घेत नाही. त्यामुळेच समाजातील सर्व स्तरातील नागरिकांना ॲानलाई व्यवहार कळावे म्हणून प्रशिक्षण , रोजच्या जीवनात आपल्या गरजांसाठी इंटरनेटचा सहज वापर करता यावा म्हणून नोंदणी आणि यासोबतंच सर्वसामान्य नागपूरकरांसाठी सायबर युगात सुरक्षा, समाधान आणि सकारात्मक वापर यासाठी ही वेबसाईट नक्कीच फायद्याची ठरेल आणि सर्व काही निःशुल्क.